शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभेसाठी २०२ मतदानकेंद्रे क्रिटिकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:34 IST

मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण; एकूण २ हजार ४५२ केंद्रे, इन कॅमेरा मतदानही होणार

ठाणे : पोलीस यंत्रणेसह निरीक्षक व निवडणूक यंत्रणांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार ४५२ मतदानकेंद्रांपैकी २०२ केंदे्र क्रिटिकल म्हणून घोषित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे या मतदारकेंद्रांसाठी जादा पोलीस बळासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ), मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण, मतदारांचे छायाचित्रीकरण, इन कॅमेरा मतदान आदींची खास उपाययोजना केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सेंटर मॅजिस्टिक आणि पोलीस यांच्यातील एकमताने ठाणे लोकसभेच्या क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड करण्यात आली. या क्रिटिकल मतदानकेंद्रांसाठी विविध निकष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदानकेंद्रांवर गेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले असावे. यातील ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास हा निकष विचारात घेतला आहे. याप्रमाणेच मतदानकेंद्रात जास्तीतजास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र असणे, एकाच परिवारातील मतदार एकत्र येण्याऐवजी एकेक करून (सिंगल व्होटर) मतदान केलेल्या मतदारांची संख्या जास्त असणे, रेसिडेन्सिअल मतदार जास्तीतजास्त असणे इत्यादी निकषांवर हे क्रिटिकल मतदानकेंद्र निश्चित केले आहे.यंदा निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत २०२ क्रिटिकल मतदानकेंद्रे घोषित झाली आहेत. यामुळे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघांत क्रिटिकल केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. ठाणे मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही २०२ मतदानकेंद्रे ११६ ठिकाणी आहेत. यामध्ये मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात ३४ मतदानकेंद्रे क्रिटिकल आहेत. याप्रमाणेच ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ३५, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ३०, ठाणे विधानसभा मतदारसंघात २७, ऐरोलीत ३७ आणि बेलापूरमध्ये ३९ मतदानकेंद्रे क्रिटिकल म्हणून घोषित केली आहेत.मुंब्रा, दिव्यातील ५९ मतदानकेंद्रे संवेदनशीलमुंब्रा : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाºया मुंब्रा, दिव्यात मतदानासाठी एकूण २३८ मतदानकेंद्रे आहेत. त्यापैकी ५९ केंद्रे संवेदनशील आहेत. यामध्ये मुंब्य्रातील ४७ आणि दिव्यातील १२ मतदानकेंद्रांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला केंंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाºयांच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे