ठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी भागातील शिवसेनेच्या शाखेसमोर उभ्या करण्यात आलेल्या 18 दुचाकींना अज्ञातांनी आग लावली. आज पहाटे 2.36 वाजता ही आग लावण्यात आली.
ही घटना चंदनवाडीतील अल्मेडा रोडवरील हनुमान सोसायटीसमोर घडली. दुचाकी पेटविणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.