मीरा भार्इंदर मध्ये सत्ताधारी भाजपाची उपोषणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:10 IST2018-04-12T22:10:59+5:302018-04-12T22:10:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह सह देशभरात ठिकठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आज एकदिवसीय निषेध

मीरा भार्इंदर मध्ये सत्ताधारी भाजपाची उपोषणाकडे पाठ
मीरारोड - पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह सह देशभरात ठिकठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आज एकदिवसीय निषेध उपोषणाला बसले असताना मीरा भाईंदर मध्ये सत्तेत असलेल्या भाजपाचे आमदार, महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, गटनेता, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष पासुन पदाधिकारी यांनी मात्र उपोषणा कडे पाठ फिरवली.
पंतप्रधानांनी आजचे निषेध उपोषण आधी जाहिर केलेले असताना देखील भाजपाच्या महिला बालकल्याण मधील नगरसेविका तर वृक्ष प्राधिकरण समिती मधील नगरसेवक मात्र अनुक्रमे दार्जिलींग व नैनितालच्या दौरयांना गेले . निवडुन येण्यासाठी मोदी - शाह लागतात पण त्यांनी केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ मीरा भार्इंदर मधील भाजपा नेतृत्वासह नगरसेवक, पदाधिकारी मात्र पाठ फिरवतात अशी खंत काही कार्यकर्त्यांनी बोलुन दाखवली.
तर उपोषण हे फक्त खासदारांसाठीच होते व यासाठी पक्षाचा कुठलाही कार्यक्रम वा आदेश आला नव्हता. म्हणुन उपोषण कोणी केले नाही असे भाजपा नगरसेवक सुरेश खंडेलवाल म्हणाले.