उल्हासनगरातील भीषण घटना, मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत तिघांचा मृत्यू, ३ जखमी, चालकाला अटक
By सदानंद नाईक | Updated: December 18, 2023 16:27 IST2023-12-18T16:26:52+5:302023-12-18T16:27:34+5:30
कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली.

उल्हासनगरातील भीषण घटना, मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत तिघांचा मृत्यू, ३ जखमी, चालकाला अटक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरातील रेमंड दुकानाच्या समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालकांच्या धडकेत ओला रिक्षातील २ तर एक रिक्षा चालक असे एकून ३ जणांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. मध्यवर्ती पोलीसांनी कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक करून गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर शांतीनगर येथील कल्याण-अंबरनाथ मुख्य रस्त्यावर रेमण्ड दुकांना समोर सोमवारी पहाटे ५ वाजता मद्यधुंद कार चालक लवेश केवलरामानी यांच्या कारची दोन रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ओला रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा वय-३३, अंजली जाणा वय-६१ व दुसऱ्या रिक्षाचा रिक्षाचालक संभु रामअवध चौहान यांचा जागीच मृत्यू झाला. ओला रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद यांच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृत सोमुदीप जाणा हा सकाळी कलकत्त्यावरून मावशी अंजली जाणा हिला घेऊन आला होता.
कल्याण रेल्वे स्टेशनवरून जाणा हा मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी शांतीनगर येथे एका भरधाव कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षासह काही कारला जोरदार धडक दिली. यामध्ये संभु चौहान या रिक्षाचालकांचा जागीच मृत्यू झाला असून तो कॅम्प नं-४ येथील पेन्सिल फॅक्टरी परिसरात राहणारा आहे. अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला होता. तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कार मधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यानंतर पोलिसांनी कार मधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.