वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार
By अजित मांडके | Updated: April 29, 2023 17:01 IST2023-04-29T16:59:05+5:302023-04-29T17:01:00+5:30
येत्या १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे.

वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला ठाणे शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
येत्या १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , काँग्रेस या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ठाणे शहरातून सुमारे १९७ बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या असून ठाणे शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील सुमारे १० हजार कार्यकर्ते या सभेला जाणार आहेत. दुपारी ३ वाजता सर्व बसगाड्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत, असे परांजपे यांनी सांगितले.
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, मुरबाड, शहापूर , अंबरनाथ, बदलापूर येथूनही साधारणपणे १५ ते २० हजार कार्यकर्ते वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"