शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

मलंग गडावरील फ्युनिक्यूलर रेल्वेला आणखी दहा महिने?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 6:02 PM

श्रीमलंग गड येथील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिल २०१७मध्ये गती मिळण्याची शक्यता होती.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - श्रीमलंग गड येथील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिल २०१७मध्ये गती मिळण्याची शक्यता होती, त्यासही आता १० महिने झाले, परंतू अद्यापही त्या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. ‘लोकमत’ने या प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली असून ते काम पूर्ण होण्यासाठी पुढील डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. फ्यूनिक्यूलर रेल्वे साठी रुळांचे काम करण्यासाठी लागणा-या ९ पिलरपैकी अवघ्या ३ पिलरचे काम आताशी पूर्ण झाले असून अन्य ६ पिलर टाकण्याचे काम बाकी आहे. त्यापैकी ३ अवघड तर अन्य तीन सोप्या पद्धतीचे पिलर असल्याची माहिती रुळांचे काम करणारे तज्ज्ञ सल्लागार, सह ठेकेदार वसंत जोशी यांनी सांगितले.

त्यास आणखी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असून मे महिन्यात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रुळापाठोपाठ अन्य अवजड सामान नेणे, ते बसवणे, त्यासह डबे नेणे, त्याची रितसरत चाचणी घेणे, तपासण्या करण्याचे काम होणार आहे. पावसाळयाच्या दिवसात धुके, पावसाच्या सरींमुळे तेथे काम करणे फारसे शक्य होत नाही. त्यामुळे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अन्य तांत्रिक कामे होतील, तसेच वरच्या भागात असणा-या स्टेशनचीही बांधणी होणार असल्याचे जोशी म्हणाले. पण त्या सर्व कामांची पूर्तता होण्यासाठी सुमारे दिवाळीच उजाडणार असल्याचेही जोशी म्हणाले.

गतवर्षी एप्रिलमध्ये खासदार शिंदेंनी श्रीमलंगवाडीला भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यावेळी फ्युनिक्युलरचे प्रकल्पाचे काम करणारे वसंत जोशी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, गट विकास अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. २००८ पासून सुप्रिम कंपनीने सुरु केलेले काम आर्थिक मुद्यांमुळे बंद पडले होते. २०१३ पासून पुन्हा त्यास गती मिळावी यासाठी प्रयत्न झाले होते, परंतू ते न झाल्याने अखेरीस खासदार शिंदे यांनी या कामाला गती देण्यासाठी पाठपुरवा केला होता, त्यानिमित्ताने एप्रिलमध्ये भेट देण्यात आली होती. त्यानंतर सुप्रिम कंपनीला काळया यादीत का टाकण्यात येऊ नये असा सवाल खासदार शिंदेंनी केली होता. परिणामी त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या प्रकरणाची नोंद घेत त्या कंपनीला काळया यादीत टाकण्याची तंबी देत संधी दिली, पण तरीही काम अद्याप झालेले नाही.

मध्यंतरीच्या काळात पालकमंत्री शिंदेंच्या दालनात बैठका झाल्या आणि आता पुन्हा कामास सुरुवात झाली, पण तरीही प्रत्यक्षात ही सुविधा मिळण्यासाठी साधारणत: डिसेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्या प्रकल्पाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, असे त्यावेळी जोशी म्हणाले. हा प्रकल्प ८० कोटींचा असून त्यातील केवळ सुमारे १० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित होता, अद्यापही तो मिळतांना अडचणी येत असून आताही ९ कोटींचे काम बाकी असून खासदार शिंदेंच्या भेटीसह पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दहा महिन्यात अवघ्या १ कोटींचे काम झाले आहे. आणखी ९ कोटींचे काम असून जर या गतीने काम झाल्यास पुढील वर्षी देखिल ही सुविधा मलंग भक्तांना मिळणार की नाही यात साशंकता असल्याचे जाणकार सांगतात.या कामात आता कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खासदार शिंदेंनी त्यावेळी दिला होता, परंतू तरीही काम का झाली नाहीत, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता शिवसेना काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत असून खासदार शिंदेंच्या भूमिकेकडे सगळयांचे लक्ष लागलेले आहे.

 सुप्रिम कंपनीने हे काम हाती घेतले होते. पण निधी वेळेवर न देण्यामुळे ते वेळोवेळी रखडले, हा प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यामागे केवळ सुप्रिम कंपनी जबाबदार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात त्यासंदर्भात वेळोवेळी बैठका झाल्या, त्यात त्यांना काळया यादीत टाकावे असा प्रस्ताव आला होता, पण केवळ एक संधी द्यावी त्यांना देण्यात आली असून आता काम सुरु झाले आहे, ते मे महिन्यात पूर्ण होऊन पावसाळयानंतर ती सुविधा पर्यटकांसह मलंग भक्तांना मिळेल - खासदात श्रीकांत शिंदे.