शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पोकलेनच्या धक्क्याने दहा इंचाची जलवाहिनी फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:37 IST

नौपाडयातील विष्णूनगर येथे पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी खोदकाम करताना पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. फुटलेल्या दहा इंचाच्या जलवाहिनीमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब जलवाहिनीचा पाणी पुरवठा सुरू झाल्यावर समोर आल्यानंतर तातडीने ते काम ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले.

ठळक मुद्दे लाखो लीटर पाणी वायाकाही तासांनी पाणी पुरवठा सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नौपाडयातील विष्णूनगर येथे पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी खोदकाम करताना पोकलेनचा धक्का लागून सोमवारी सकाळी फुटली. फुटलेल्या दहा इंचाच्या जलवाहिनीमुळे लाखो लीटर पाणी वाया गेले. ही बाब जलवाहिनीचा पाणी पुरवठा सुरू झाल्यावर समोर आल्यानंतर तातडीने ते काम ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले. त्यानंतर दुपारच्या सुमारास कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील विष्णूनगर येथे ठामपा पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी पोकलेनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. हे काम सुरु असताना त्या पोकलेनचा धक्का भूमीगत असलेल्या दहा इंचाच्या जुन्या पाण्याच्या जलवाहिनीला बसला आणि ती जलवाहिनी सोमवारी सकाळच्या सुमारास फुटली. मात्र, जलवाहिनीमध्ये पाणी नसल्याने तातडीने तो प्रकार समजून आला नाही. पण, अर्धा एक तासाने पाणी पुरवठा सुरू झाल्यावर जलवाहिनी फुटल्याची बाब उघडकीस आली. यामुळे मोठया प्रमाणात पाणी वाहून गेल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्या फुटलेल्या जलवाहिनीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्यानंतर दुपारच्या सुमारास त्या परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणी