शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:01 AM

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.

ठाणे - बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे.सीडीआर प्रकरणात गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ ने १४ मार्च रोजी अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांना अटक केली होती. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांचे वकील असलेल्या अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांनी सीडीआर प्रकरणातील आरोपीकडून बेकायदेशीर सीडीआर मिळवल्याचा आरोप आहे. अ‍ॅड. सिद्दीकी यांचे मोबाइल फोन्स तपासण्याचे काम सुरू असतानाच, त्यांच्याविरोधात दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यापैकी एक तेलुगू अभिनेत्री आकृती नागपाल यांची होती.चार वर्षांपूर्वी आकृती यांच्या पतीने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. अ‍ॅड. सिद्दीकी हे त्यांचे पती अनिल मिस्त्री यांचे वकील आहेत. आकृती यांचे कॉल रेकॉर्ड आपल्याजवळ असून ते आपण न्यायालयाला सादर करू शकतो, असे त्यांचे पती अनिल मिस्त्री यांनी न्यायालयामध्ये म्हटले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपले सीडीआर मिळवण्यासाठी अ‍ॅड. सिद्दीकींनी पतीला मदत केली असावी, असा संशय या अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. याबाबत आकृती यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून या तक्रारीचा पाठपुरावा करण्याची विनंती आकृती यांनी गुरुवारी पोलिसांना केली.

टॅग्स :CDR caseसीडीआर प्रकरणCrimeगुन्हाnewsबातम्या