काय हवे ते सांगा? दुकाने आतून सुरू, बाहेरून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:27+5:302021-07-27T04:41:27+5:30

रिॲलिटी चेक प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असली, तरी ...

Tell me what you want? Shops start from the inside, closed from the outside | काय हवे ते सांगा? दुकाने आतून सुरू, बाहेरून बंद

काय हवे ते सांगा? दुकाने आतून सुरू, बाहेरून बंद

Next

रिॲलिटी चेक

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली असली, तरी तिसऱ्या लाटेचा धोका पाहता, राज्य सरकारच्या आदेशानुसार केडीएमसी हद्दीत आजही निर्बंध लागू आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन नागरिकांबरोबर दुकानदारांकडूनही होत आहे. दुकानाच्या बंद शटरआडून मालाची विक्री चालू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मात्र सर्रासपणे शटर उघडे ठेवूनही बिनदिक्कतपणे नियम मोडले जात आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना नियम घालून देताना अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चालू ठेवण्यास वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता, ही बंधन कायम ठेवली आहेत. मात्र, ही मर्यादा ओलांडणाऱ्या दुकानांना दंड ठोठावण्याची आणि सील ठोकण्याची कारवाई केडीएमसीकडून सुरूच आहे. याउपरही भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, मच्छी, मटण विक्रेत्यांवर कारवाई करूनही उघड्यावर तसेच बंद दुकानाच्या आड त्यांचे धंदे सर्रास सुरू आहेत. कपडा व्यापाऱ्यांसह अन्य व्यापाऱ्यांकडूनही शटर बंद ठेवून मागच्या दाराने मालाची विक्री केली जात असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीतील मुख्य बाजारपेठांसह अंतर्गत भागांमध्ये पाहायला मिळत आहे. दुपारी ४ नंतर आपल्याच कामगारांना बंद दुकानाच्या बाहेर उभे करून ग्राहक आल्यास त्याला मागच्या दरवाजाने प्रवेश दिला जात आहे. काही भागांत तर दुकानांचे शटर उघडे ठेवून मालाची सर्रास विक्री सुरू आहे.

मनपा आणि पोलिसांचे अभय मिळत असल्याने हे प्रकार उघडपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकानांना पूर्णवेळ दुकाने बंद करण्याच्या सूचना आहेत. परंतु, हा नियमही पायदळी तुडवला जात आहे. यात प्रामाणिकपणे दुकान बंद ठेवून सरकारी नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.

-------------------

कारवाईचे दावे

निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या आतापर्यंत २०० हून अधिक दुकानांना दंड ठोठावण्याची आणि सील ठोकण्याची कारवाई केडीएमसीने केली आहे. प्रत्येक प्रभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुपारी ४ वाजल्यानंतर गस्त घालण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. परंतु, गस्त घालूनही दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. दरम्यान, आमची कारवाई सुरूच असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे.

-------------------------------

इथे होते नियमांचे उल्लंघन

कल्याण-आग्रा रोड, शिवाजी चौक ते महमदअली चौक, खडकपाडा, वल्लीपीर रोड, दुधनाका, अन्सारी चौक, खडेगोळवली, काटेमानिवली, पुणे-लिंक रोड, चिंचपाडा, डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर, फडके रोड, ठाकुर्ली, डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, देवीचा पाडा, कुंभारखान पाडा, महाराष्ट्रनगर, उमेशनगर, टेलकोसवाडी, वेताळनगर, गरिबाचा वाडा याठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.

-----------

Web Title: Tell me what you want? Shops start from the inside, closed from the outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.