बांगलादेशींची माहिती सांगा आणि बक्षीस मिळवा, शिवसेना युवानेत्याचे आवाहन

By सदानंद नाईक | Updated: January 28, 2025 10:47 IST2025-01-28T10:46:47+5:302025-01-28T10:47:34+5:30

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरांत बांगलादेशी नागरिकांची माहिती सांगा ऐक हजार १११ रुपयाचे बक्षीस मिळवा. असे आवाहन शिवसेनेचे युवानेता विकी भुल्लर यांनी करून शहरातील विविध भागात तसे पोस्टर्स लावले आहेत.

Tell information about Bangladeshis and get a reward, appeals Shiv Sena youth leader | बांगलादेशींची माहिती सांगा आणि बक्षीस मिळवा, शिवसेना युवानेत्याचे आवाहन

बांगलादेशींची माहिती सांगा आणि बक्षीस मिळवा, शिवसेना युवानेत्याचे आवाहन

उल्हासनगर - शहरांत बांगलादेशी नागरिकांची माहिती सांगा ऐक हजार १११ रुपयाचे बक्षीस मिळवा. असे आवाहन शिवसेनेचे युवानेता विकी भुल्लर यांनी करून शहरातील विविध भागात तसे पोस्टर्स लावले आहे. गेल्या दोन महिन्यात १२ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. 

शहरातील विविध भागात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरी नागरिकांना पकडण्यासाठी शिवसेना नेते राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांनी विशेष मोहीम उघडली आहे. एकट्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात बांगलादेशी पकडल्याचे पाच गुन्हे दाखल झाले. तर शहर गुन्हे विभागानेही विविध ठिकाणाहून १२ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केली. युवानेते विकी भुल्लर यांनी शहरातील विविध ठिकाणी पोस्टर्स लावून बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास ऐक हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच कोणत्याही व्यक्तीला कामावर ठेवण्यापूर्वी त्याची चौकशी करावी. असे आव्हान व्यापाऱ्यांना भुल्लर यांनी केले आहे. 

Web Title: Tell information about Bangladeshis and get a reward, appeals Shiv Sena youth leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.