अपघातात शिक्षिका जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:09 IST2017-08-06T04:09:39+5:302017-08-06T04:09:39+5:30
मोटारसायकलवरून घरी जाताना अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय खासगी क्लासच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कॅडबरी उड्डाणपुलावर घडली.

अपघातात शिक्षिका जागीच ठार
ठाणे : मोटारसायकलवरून घरी जाताना अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय खासगी क्लासच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कॅडबरी उड्डाणपुलावर घडली. या अपघातामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणाºया मार्गिके वर १५-२० मिनिटे वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळावरून मृतदेह उचलल्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचा दावा वाहतूक शाखेने केला आहे.
अमृता भालचंद्र जडेजा (२६) असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ती बाळकुम येथील रहेजा कॉम्प्लेक्स येथे राहणारी होती आणि परळ येथून मोटारसायकलने शनिवारी दुपारी बाळकुम येथे घरी येत होती. याचदरम्यान, तिची मोटारसायकल कॅडबरी उड्डाणपुलावर आल्यावर तिच्या मागून येणाºया अनोळखी वाहनाने धडक दिली. यामध्ये ती खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. याप्रकरणी अनोळखी वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गरदे करत आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर नित्याची वाहतूककोंडी असते. त्यातच या अपघातामुळे या महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर काही प्रमाणात झाला.