शिक्षक भारतीचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST2021-02-25T04:54:39+5:302021-02-25T04:54:39+5:30
वासिंद : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, या मागण्या पूर्ण न ...

शिक्षक भारतीचा आंदोलनाचा इशारा
वासिंद : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा शिक्षक भारतीतर्फे जि. प. अध्यक्षा सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एप्रिल २०२० पासून रखडलेली वैद्यकीय बिले मिळावीत, दहा ते बारा वर्षे रखडलेल्या शाळांच्या फंडाच्या पावत्या मिळाव्यात, जिल्ह्यातील पदोन्नती पात्र शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत कार्यवाही करावी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी याचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्या आहेत.
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ तारमळे, जिल्हा सचिव रवींद्र पालवी, जिल्हा संघटक गणेश सपकाळ, डॉ. विजय घोडविंदे, अशोक चौधरी, वसंत तेलंग उपस्थित होते. निवेदनाची प्रत शिक्षक भारतीचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनाही देण्यात आल्याचे तारमळे यांनी सांगितले.