शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

टीडीआर घोटाळा : बदलापूर पालिकेचा माजी मुख्याधिकारी गोसावीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:28 AM

बदलापुरातील ११२ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्यातील आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी हे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखेला चकमा देत होते.

बदलापूर -  बदलापुरातील ११२ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्यातील आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी हे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक गुन्हे शाखेला चकमा देत होते. अखेर मंगळवारी त्यांना ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने ठाण्यातून अटक केली. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बदलापूर शहरात टीडीआरच्या नावावर राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केला होता. आरक्षित भूखंड विकसीत करण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात टीडीआर (विकास हक्क हस्तांतरण) लाटण्याचे काम केले गेले. टीडीआर घेतांना त्या आरक्षित भूखंडांचा योग्य आणि नियमानुसार विकास करण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे तर रस्त्यांचे काम करुन मोठ्या प्रमाणात टीडीआर लाटण्यात आला. या टीडीआरची प्रक्रियाच चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बदलापुरातील बड्या राजकीय पुढाºयांची देखील चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर त्यात तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांचे नाव पुढे आले. मात्र, गोसावी हे अटक टाळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत राहिले. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर त्यांची अटक निश्चित झाली होती. मात्र, गोसावी हे पोलिसांना शरण न येता फरार होते. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास असल्याने त्यांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न केले; परंतु गोसावी हे त्यांना सापडले नाही. तब्बल दोन वर्षांनंतर मंगळवारी गोसावी यांना ठाण्यातून अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी सांगितले.टीडीआर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार आॅगस्ट २०१५ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी, सहायक नगररचनाकार सुनील दुसाने आणि इतर अभियंंत्यांवर गुन्हे दाखल झाले होते.टीडीआर प्रकरणात बदलापुरातील अनेक राजकीय नेत्यांची आणि नगरसेवकांची चौकशी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर शिवसेना नगरसेवकाला अटक झाली होती.टीडीआर घोटाळा प्रकरणातील सर्व फाईल शासनाच्या ताब्यात असून या प्रकरणात अजूनही चौकशीचे सत्र सुुरुच आहे. हा घोटाळा ११२ कोटींच्या घरात असल्याचा निष्कर्ष शासनाने काढला आहे.

टॅग्स :Arrestअटकbadlapurबदलापूर