शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
4
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
5
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
8
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
9
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
10
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
11
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
12
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
13
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
14
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
15
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
16
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
17
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
18
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
19
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
20
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचा ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 06:18 IST

अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर : ठामपाचे उत्पन्न होणार कमी

ठळक मुद्देमागील २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव गुरुवारी महासभेत मंजूर करण्यात आला. तब्बल साडेचार वर्षांनंतर मागील निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने सत्ताधारी शिवसेनेने पाऊल टाकले आहे. महापालिकेने मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठवला जाणार आहे. महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनही राज्य शासनाने ठराव मंजूर केल्यास हा निर्णय महापालिकेकरिता आत्मघातकी ठरण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा हा केवळ चुनावी जुमला ठरेल, असे बोलले जाते.

मागील २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. मुंबईत याच आश्वासनाची यापूर्वी अंमलबजावणी झाल्यानंतर ठाण्यात विरोधी पक्षांनी टीका केली होती. निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी जुन्या वचनाची पूर्तता केली. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. 

गुरुवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दाखला देत, ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली.  सभागृह नेते अशोक वैती यांनी तसा ठराव सभागृहात मांडला. त्याला विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मंजुरी दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मार्च २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या व छोट्या घरांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या ठाणेकरांसाठी ही गोड बातमी आहे. मंजूर ठराव तयार करून अंतिम मंजुरीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाईन आणि सरकारकडून त्यावर मोहोर उठवलेली आणून दाखवेन, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भाजपची केली कोंडीसत्ताधाऱ्यांनी अचानक हा ठराव मंजूर करून घेऊन भाजपच्या विरोधाची हवाच काढली. २१ महिन्यांनंतर होणाऱ्या महासभेत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करण्याच्या तयारीने आलेल्या भाजप नगरसेवकांची सत्ताधाऱ्यांनी हवा काढली. त्यामुळे विरोध करायचे सोडून त्यांना या ठरावाच्या बाजूने कौतुक करावे लागले. सरकारकडून हा ठराव लवकर मंजूर करून आणून ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी करताना हा निवडणुकीचा जुमला ठरू नये, असे मत भाजपच्या सदस्यांनी व्यक्त केले.

आर्थिक संकट गडद होणारकोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. सध्याच्या घडीला तिजोरीत अवघे सात कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात मागील महिन्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींहून अधिक बोजा पडणार आहे. शिवाय ठेकेदारांची आजही ६५० कोटींची बिले अदा करायची आहेत. तसेच पालिकेवर सुमारे चार हजार कोटींचे दायित्व आहे. त्यात आता ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या तिजोरीवर १५० ते १७५ कोटींचा बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग आणि करमाफी यामुळे पालिकेला २७५ कोटींहून अधिक रकमेची तजवीज करावी लागेल. सरकार या सर्व परिस्थितीचा विचार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका