शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

आमदारांच्या गावातच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 02:33 IST

जलुबाईची विहीर आटली; आश्रमशाळेला सुटी असल्याने मुलांची त्रासातून सुटका

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस तीव्र होते आहे. येथील १४२ गावपाड्यांत टंचाईच्या झळा बसत असून या गावांमध्ये आमदारांच्या गावाचाही समावेश आहे.पेंढरघोळ हे तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा यांचे गाव. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पाणीयोजना राबवण्यात आली आहे. कधीही न आटणाऱ्या जलुबाई या विहिरीवरून पाणीयोजना तयार करण्यात येऊन अनेक वर्षांपासून येथे पाणीपुरवठा केला जातो. तीन पाडे जवळजवळ असल्याने त्यांनादेखील पाण्याचा प्रश्न कधी भेडसावला नाही. मात्र, या गावाला पाणी पुरवण्यासाठी असलेली जलुबाईची ही विहीर यंदा आटली. परिणामी, आज या पाड्याला आटगाव, पेंढारघोळच्या सरपंच पद्मावती बरोरा यांच्या प्रयत्नाने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या विहिरींच्या वरच्या बाजूला असणारा तलावही यंदा लवकरच आटला. यामुळे परिसराला बारमाही पाणीपुरवठा केल्यानंतरही भरून राहणाºया या विहिरीने आता तळ गाठला आहे. विहीर कोरडी झाल्याने या पाड्यांना पाण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. या पाड्यातच आदिवासी आश्रमशाळा आहे. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्याने ते घरी गेले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टळली आहे. सातशे ते साडेसातशे लोकसंख्या असलेल्या या पाड्याला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.अखेर दुर्गापूरवासीयांना टँकरने पाणीपुरवठामुरबाड : शहापूरपाठोपाठ मुरबाड तालुक्यातही पाणीटंचाई तीव्र होते आहे. त्यातच, आठवडाभरापूर्वी तालुक्यातील दुर्गापूर येथील ‘पाण्यासाठी नववधू विहिरीवर’ गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि हे गाव एकदम प्रकाशझोतात आले. मुरबाड पंचायत समितीने त्याची तत्काळ दखल घेत तेथे टँकरची सुविधा उपलब्ध केल्याने दुर्गापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.डिसेंबरपासून धसई परिसरातील कळभांड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गापूर येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, तरीही दुर्गापूर गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नाही.मुरबाड तालुक्यातील २०७ गावांपैकी चार गावे आणि १४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असून त्यात अजून वाढ होऊ शकते. १० गावे आणि १५ वाड्यांमध्येदेखील तीव्र स्वरूपात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता दुर्गापूर गावाला त्यात प्राधान्य दिल्याने त्या ठिकाणी दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.पाऊस लवकर गेल्याने या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.- पद्मावती बरोरा, सरपंच, आटगाव-पेंढरघोळ ग्रामपंचायतकधीही न आटणारी विहीर आटल्याने पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करणे सुरू आहे. पुढच्या वर्षी हाच त्रास जाणवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येईल.- भास्कर बरोरा, माजी सरपंच

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई