शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचा डीपीआर ९ महिन्यांत; प्रकल्पाला गती देण्याच्या खा. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 5:01 PM

डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येत असून येत्या अवघ्या ९ महिन्यांमध्ये तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे.

ठाणे - डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश येत असून येत्या अवघ्या ९ महिन्यांमध्ये तळोजा-डोंबिवली-कल्याण या मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर होणार आहे. एमएमआरडीएने यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली असून येत्या ९ महिन्यांत प्रकल्प अहवाल प्राप्त होणार असल्याचे एमएमआरडीएने खासदार डॉ. शिंदे यांना पत्राद्वारे कळवले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्यावर्षी २० ऑक्टोबर रोजी वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन तळोजा-डोंबिवली-कल्याण मेट्रोचे सादरीकरण केले होते.  डोंबिवलीकरांना ठाणे आणि मुंबईला येण्यासाठी रेल्वे वगळता अन्य पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडल्यानंतर त्यांचे अतोनात हाल होतात. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याणपर्यंत येणारी मेट्रो नवी मुंबई मेट्रोला तळोजा येथे डोंबिवली आणि शीळ मार्गे जोडावी, अशी मागणी केली होती. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच बैठकीत या मार्गाला तत्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर खा. डॉ. शिंदे सातत्याने एमएमआरडीए आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर पाठपुरावा करत आहेत. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक झाली असता त्यांनी सदर मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेण्याची ग्वाही दिली होती. त्यावर त्वरित या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली होती. त्यानुसार दिल्ली मेट्रोची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली असून येत्या ९ महिन्यांतच सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याचे एमएमआरडीएने कळवले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा गाठला गेला असून डोंबिवलीकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. केवळ डोंबिवलीच नव्हे, तर कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ,  दिवा, २७ गावे, मुंब्रा, कौसा, व १४ गवे अशा विस्तीर्ण प्रदेशातील सुमारे २० ते २५ लाख  नागरिकांना या मेट्रोचा लाभ होणार असल्याचे खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.