सत्ताधारी भाजप नगरसेवकांचा ठिय्या, फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 14:45 IST2018-03-21T14:45:25+5:302018-03-21T14:45:25+5:30
फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावर काहीही कारवाई होत नसल्याने फ प्रभाग समितीमधील सत्ताधारी भाजपचे पाच नगरसेवक उपोषणाला बसले असून आधी ठोस कायमस्वरूपी कारवाई हवी असा पवित्रा त्या नगरसेवकांनी घेतला आहे.

सत्ताधारी भाजप नगरसेवकांचा ठिय्या, फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करा
डोंबिवली - फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावर काहीही कारवाई होत नसल्याने फ प्रभाग समितीमधील सत्ताधारी भाजपचे पाच नगरसेवक उपोषणाला बसले असून आधी ठोस कायमस्वरूपी कारवाई हवी असा पवित्रा त्या नगरसेवकांनी घेतला आहे. अधिकारी आणि अन्य यंत्रणा यांचे संगनमत असून त्यामुळे गँभिर स्थिती निर्माण झाली आहे.
सातत्याने केवळ आश्वासने दिली जात असून ते योग्य। नाही. अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी घेतली, त्याला सभापती खुशबु चौधरि यांनी दिला पाठिंबा. तसेच नगरसेवक विसद्विप पवार, राजन अभाळे, निलेश म्हात्रे, सुनीता पाटील, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी सहभागी होत संताप व्यक्त केला.
अनधिकृत बांधकाम संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला असूनही कारवाई का केली जात नाही. प्रभाग अधिकारी अमित पंडित या बकलीला जबाबदार असून त्यासाठी त्यांच्यावर कारवाई करा अशी।मागणी नगरसेवकांनी केली. ग आणि फ प्रभाग भाजपचे नगरसेवकानी मांडला ठिय्या.