शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ताडीच्या अतिसेवनाने घेतला दोघांचा जीव; डोंबिवलीच्या कोपरगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 08:25 IST

विक्रेत्याच्या शोधासाठी पथके रवाना

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपरगावात ताडीचे अतिसेवन दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे. सचिन पाडमुख (२२) आणि स्वप्निल चोळखे (३०) अशी त्यांची नावे आहेत. यातील स्वप्निल हा ट्रॅफिक वॉर्डन होता. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी ताडी केंद्र चालविणाऱ्या रवी बथणी याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तो फरार झाला असून, त्याला अटक करण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.

सचिन आणि स्वप्निल हे अन्य दोघा मित्रांसमवेत पश्चिमेतील अण्णानगर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला गावदेवी मंदिराजवळील कोपरगावातील एका ताडी विक्री केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले होते. तेथे सचिन आणि स्वप्निलने ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांना त्रास झाला. त्यांची प्रकृती ढासळल्याने दोघांना रुग्णालयात दाखल केले; परंतु ताडीच्या अतिसेवनामुळे त्यांच्या छातीवर दाब आला आणि त्यात हृदयविकाराचा झटका येऊन दोघांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ताडी विक्री केंद्रावर पोहोचले. परंतु तत्पूर्वीच केंद्र चालविणारा रवी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल केला असून, त्याच्या अटकेसाठी पथके पाठवण्यात आली आहेत.  माजी मंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी भालेराव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. घटनेबाबत खेद व्यक्त करताना बेकायदा सुरू असलेल्या केंद्राबाबत दारू उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. जास्त नशा येण्यासाठी ताडीत मोठ्या प्रमाणात रसायने मिसळली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे ताडी विक्री केंद्र बेकायदा होते.

‘लवकरच कामावर रुजू होणार होता’

स्वप्निल हा २०१५ पासून डोंबिवली वाहतूक विभागात कार्यरत होता. परंतु, संधिवाताच्या त्रासामुळे तो दीड महिन्यापासून वैद्यकीय रजेवर होता. लवकरच तो कामावर रुजू होणार होता. परंतु सोमवारी त्याचा मृत्यू झाला. स्वप्निलच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे. तर सचिन हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण आहेत. 

ताडीच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू ओढावला, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्यांनी प्राशन केलेल्या ताडीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांचा अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होणार आहे.

- पंढरीनाथ भालेराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीPoliceपोलिस