शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह ठाण्यातून तडीपार केलेल्या गुंडाला काशीमीरा भागातून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 23, 2018 21:19 IST

मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी मुंबई आणि ठाणे जिल्हयातून तडीपार केलेल्या आशिष उर्फ बंटी चौबे याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने काशीमीरा भागातून अटक केली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईदोन वर्षांसाठी केले हद्दपारहाणामारीसह अनेक गुन्हे दाखल

ठाणे: मुंबई ठाण्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आशिष उर्फ बंटी अरविंद चौबे (३०, मीरा रोड, ठाणे) याला काशीमीरा भागातून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली. त्याच्यावार हाणामारीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.चौबे याला मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या परिमंडळ १२ चे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी हद्दपार केले आहे. तो आपले अस्तित्व लपवून काशीमीरा भागातील क्लस्टर क्रमांक एक भागात फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना मिळाली होती. त्या आधारे २२ आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या बडाख यांच्या पथकाने चौबेला अटक केली. पोलीस पथकाला पाहून त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध दंगल, विनयभंग आणि हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध १४२ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक