शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते -   धनश्री लेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 4:55 PM

सरस्वती शाळेच्या पटांगणात धनश्री लेले यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर विवेचन केले.  

ठळक मुद्देरामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफलेयुगपुरूष विवेकानंद या विषयावर व्याख्यानरसिकांना केले मंत्रमुग्ध

ठाणे - स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विश्‍वबंधुत्वा कल्पनेत संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान, संत नामदेवांच्या भक्ती सारखी राष्ट्रभक्ती, संत एकनाथ यांच्यासारखी तोल साधण्याची वृत्ती, समाजात जागृती व्हावी यासाठी संत तुकाराम महाराजांसारखी शब्दांची तळमळ आणि धर्म आणि आत्मोन्नतीचा रामदास स्वामींचा विचार होता. स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला या महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते असे मत प्रसिध्द निवेदिका धनश्री लेले यांनी व्यक्त केले.                       रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफले. युगपुरूष विवेकानंद या विषयावर त्या बोलत होत्या. युगपुरूष विवेकानंदाच्या कार्यावर त्यांनी आपल्या रसाळ वाणीने प्रकाश टाकत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वामी विवेकानंदासाठी भारत हा प्राणधर्म होता. या प्राणधर्माचे प्रत्येकाने उत्तम रितीने पालन केले तर समाजात उद्वेष निर्माण होणार नाही. धर्म हा लोकोपयोगी असतो. उपनिषदातून आलेल्या विश्‍वबंधुत्वाची कल्पना त्यांनी मांडली. बुध्दी प्रामाण्यवादही त्यांनी आपल्याच सांगितले, त्यामुळे स्वामी विवेकानंदाचे विचार समजून घेतांना डावे - उजवे असे करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी  विवेकानंदाच्या व्यापक विचारांकडे दुषित वृत्तीने पाहू नका, त्यांच्या विचारांकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या संस्कृतीत  धर्म, विज्ञान आणि अध्यात्म एकच संकल्पना स्पष्ट आहेत. आपली संस्कृती सर्व धर्मांना सामावून घेते. आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माची परंपरा आहे, वैविध्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हा त्यांचा विचार होता. शिक्षणपध्दती केवळ माहिती म्हणजे ज्ञान नाही तर शिक्षण घेण्यासाठी मनाची दारे उघडी ठेवण्याची गरज आहे. शाळांमधून धर्मांचे शिक्षण दिले गेले तर अंधश्रध्दा दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण ज्या राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे, तसेच आपल्याला मानवता धर्माचा आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनाचा विसर पडता कामा नये, यासाठी स्वामी विवेकानंद यांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे स्मरण आपण प्रत्येकांनेच केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अद्वैता बापट यांनी वंदे मातरम सादर केले. विद्या नानल यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून दिला. नंदिनी गोरे यांनी स्वागत केले.आमदार संजय केळकर, समितीचे सचिव शरद पुरोहित व मान्यवर उपस्थितीत होते.

टॅग्स :thaneठाणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदcultureसांस्कृतिक