शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘लोकमत’मुळे सुषमादेवी मोटघरे यांना मिळाली एक लाखाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:35 PM

पती ज्येष्ठ संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे मंगळवारी निधन झाले.

कल्याण : १९८० च्या दशकात भीमकोकिळा सुषमादेवी मोटघरे यांची भीमगीते लोकांनी डोक्यावर घेतली. उतारवयात मात्र त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. सुषमादेवी यांची ही व्यथा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच कल्याणमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी मोटघरे यांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते त्यांना ही मदत देण्यात आली.पती ज्येष्ठ संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांची हलाखीची परिस्थिती प्रकर्षाने समोर आली. यासंदर्भात ‘लोकमत’च्या २४ जानेवारीच्या अंकात ‘भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली . या बातमीनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी मोटघरे यांच्या घरी जाऊन शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते त्यांना एक लाखाच्या मदतीचा धनादेश दिला. नगरसेवक गायकवाड म्हणाले की, सुषमादेवी यांची ‘लोकमत’मध्ये मांडलेली त्यांची व्यथा वाचली. त्यानंतर, त्यांच्या घरी धाव घेऊ न त्यांना एक लाखाची मदत केली. गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार पाहता शिवसेना नेहमीच उपेक्षितांच्या मदतीसाठी पुढे असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.सुषमादेवी यांना अश्रू अनावर !मदत मिळताच सुषमादेवी यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, माझ्या व्यथेला जागा दिल्याने मी ‘लोकमत’ची शतश: ऋणी आहे.तसेच मदतीबद्दल मी नगरसेवक गायकवाड आणि शिवसेनेची आभारी आहे. ‘लोकमत’चा वाचक हा संवेदनशील असल्याचे यातून दिसून आले.

टॅग्स :Lokmatलोकमत