कल्याणमध्ये सूर्यनमस्काराचा विक्रम?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:11 AM2019-01-23T01:11:42+5:302019-01-23T01:11:51+5:30

केडीएमसीची महिला-बालकल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्यातर्फे गुरुवारी, २४ जानेवारीला राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम होत आहे.

 Suryanamaskar's record in Kalyan? | कल्याणमध्ये सूर्यनमस्काराचा विक्रम?

कल्याणमध्ये सूर्यनमस्काराचा विक्रम?

Next

- जान्हवी मोर्ये
कल्याण : केडीएमसीची महिला-बालकल्याण समिती, सुभेदारवाडा कट्टा व माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना यांच्यातर्फे गुरुवारी, २४ जानेवारीला राष्ट्रीय सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम होत आहे. त्यात एकाचवेळी १० हजार विद्यार्थी सूर्यनमस्कार घालणार आहेत. या सूर्यनमस्कारांची लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत.
सूर्यनमस्कार हे आरोग्य सुदृढतेसाठी ते महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने सुभेदारवाडा कट्ट्याने मागील वर्षीही सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी एकाच वेळी साडेसात हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच धर्तीवर यंदाही हा कार्यक्रम होत असून, त्यात प्रथमच १० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या उपक्रमात शाळांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, कल्याण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, केडीएमसीच्या शिक्षण विभागाने शाळांशी पत्रव्यवहार केला आहे. या उपक्रमात कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील अंदाजे १०० शाळा सहभागी होतील, अशी माहिती कट्ट्याचे अध्यक्ष दीपक जोशी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शाळांमध्ये दाखवण्यासाठी एक व्हिडीओ दिला आहे. त्या व्हिडीओच्या साहाय्याने चार-पाच दिवसांपासून शाळांमध्ये सराव सुरू आहे. क्रीडाभारतीचे ६० ते ७० मुले गुरुवारी प्रथम टेबलवर प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. ते पाहून विद्यार्थ्यांना हे सूर्यनमस्कार घालावयाचे आहेत, असे कट्ट्यातर्फे सांगण्यात आले.
>ºिहदमवर सूर्यनमस्कार
आतापर्यंत सूर्यनमस्कार घालताना एक-दोन, असे आकडे म्हटल्यानंतर सूर्यनमस्कार मंत्रानुसार सूर्याची नावे घेतली जात होती. पण या कार्यक्रमासाठी एक खास गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याच्या ºिहदमवर सूर्यनमस्कार घातले जाणार आहेत, अशी माहिती अंकूर आहेर यांनी दिली.

Web Title:  Suryanamaskar's record in Kalyan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.