लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना महासंचालकपदी बढती मिळाल्यामुळे त्यांची राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून मंगळवारी सायंकाळी बदली झाली. याबाबतचे आदेश बुधवारी दुपारी आल्यानंतर फणसळकर यांनी आपला कार्यभार सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडे सुपूर्द केला.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ३१ जुलै २०१८ रोजी फणसळकर यांनी पदभार घेतला होता. त्यांचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वीच संपला होता. परंतू, कोरोनामुळे राज्य शासनाने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. ४ मे रोजी मात्र त्यांची महासंचालकपदी बढतीवर बदली झाल्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या पदाचा कार्यभार डॉ. मेकला यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त बिपीन शर्मा यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
ठाण्याच्या प्रभारी पोलीस आयुक्तपदी सुरेश मेकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 23:24 IST
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना महासंचालकपदी बढती मिळाल्यामुळे त्यांची राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून मंगळवारी सायंकाळी बदली झाली. याबाबतचे आदेश बुधवारी दुपारी आल्यानंतर फणसळकर यांनी आपला कार्यभार सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडे सुपूर्द केला.
ठाण्याच्या प्रभारी पोलीस आयुक्तपदी सुरेश मेकला
ठळक मुद्दे विवेक फणसळकर यांनी पदभार सोडला