कौटुंबिक कलहातून कळव्यात मुलीचा खून करून महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 13:29 IST2019-08-09T13:29:31+5:302019-08-09T13:29:38+5:30
कौटुंबिक कलहातून कळव्यात 17 वर्षीय मुलीचा खून करून प्रद्या प्रशांत पारकर (40) या टीव्ही कलाकार असलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (९ ऑगस्ट रोजी) सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

कौटुंबिक कलहातून कळव्यात मुलीचा खून करून महिलेची आत्महत्या
ठाणे: कौटुंबिक कलहातून कळव्यात 17 वर्षीय मुलीचा खून करून प्रद्या प्रशांत पारकर (40) या टीव्ही कलाकार असलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (९ ऑगस्ट रोजी) सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास तिचा पती प्रशांत जिमवरुन घरी परतला. त्यावेळी आतून दरवाजा उघडला न गेल्याने हा सर्व प्रकार समोर आला. तिला सध्या काम मिळणे बंद झाले होते. तर त्यालाही नोकरी नव्हती. यातूनच त्यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरु होते, अशी प्राथमिक माहिती मिळाल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.