एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; संजय गांधी उद्यानाजवळील खदाणीमध्ये घेतली उडी

By जितेंद्र कालेकर | Updated: August 9, 2024 22:19 IST2024-08-09T22:18:56+5:302024-08-09T22:19:09+5:30

पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत असून, तणावाखाली असल्याने ताे घरी परतला हाेता. या प्रकरणाची सखाेल चाैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Suicide of MBBS student; A jump was taken in a quarry near Sanjay Gandhi Park at thane | एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; संजय गांधी उद्यानाजवळील खदाणीमध्ये घेतली उडी

एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; संजय गांधी उद्यानाजवळील खदाणीमध्ये घेतली उडी

ठाणे - पुण्याच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय हर्ष नंदलाल गुप्ता याने ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला असलेल्या खदाणीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी चितळसर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आवारातील पटेल काॅरीजवळ एका खदाणीमध्ये ७ ऑगस्ट राेजी सकाळी १०:४५च्या सुमारास ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला एका तरुणाचा मृतदेह आढळला हाेता. त्या तरुणाची ओळख पटवण्यास चितळसर पाेलिसांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुरुवात केली. चाैकशीदरम्यान त्याचे नाव हर्ष गुप्ता असल्याचे समजले. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत असून, तणावाखाली असल्याने ताे घरी परतला हाेता. या प्रकरणाची सखाेल चाैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Suicide of MBBS student; A jump was taken in a quarry near Sanjay Gandhi Park at thane