मुंब्य्रात महिलेची मुलीसह आत्महत्या
By Admin | Updated: March 20, 2017 03:38 IST2017-03-20T03:38:47+5:302017-03-20T03:38:47+5:30
क्षयरोगाला कंटाळून मुंब्य्रातील कौसा भागातील रशीद कम्पाउंड परिसरात राहणाऱ्या शिरीन खान या २८ वर्षांच्या महिलेने तिच्या

मुंब्य्रात महिलेची मुलीसह आत्महत्या
मुंब्रा : क्षयरोगाला कंटाळून मुंब्य्रातील कौसा भागातील रशीद कम्पाउंड परिसरात राहणाऱ्या शिरीन खान या २८ वर्षांच्या महिलेने तिच्या दोन चिमुरड्या मुलांसह चौदाव्या मजल्यावरून उडी मारली. यात महिलेचा आणि तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून पाच वर्षांचा मुलगा जखमी आहे.
डायघर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खाली उडी मारली. यामध्ये तिचा आणि तिच्या तीन वर्षांच्या आमरीन या मुलीचा मृत्यू झाला. पाच वर्षांचा मुलगा तौसीफ गंभीर जखमी आहे. उपचारासाठी त्याला मुंबईतील जे.जे. रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांच्या आजारांवर मागील दोन ते तीन महिन्यांपासून विविध रु ग्णालयांमध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती खान कुटुंबातील एका नातेवाइकाने दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी. काटकर यांनी सांगितले. (वार्ताहर)