भिवंडीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:43 IST2020-01-08T01:43:19+5:302020-01-08T01:43:21+5:30

अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने क्षुल्लक वादातून राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी नारपोली येथे घडली.

Suicide engineering student in suicide | भिवंडीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

भिवंडीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

भिवंडी : अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने क्षुल्लक वादातून राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी नारपोली येथे घडली. जेवताना मोबाइलवर बोलत असल्याने तिला वडील रागावले. त्यामुळे रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले.
भूमिका नाऊ पाटील (२२, रा.नारपोली) हे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सदर युवती मूळची वळपाडा येथील राहणारी असून गेल्या काही वर्षांपासून ती कुटुंबासह नारपोली येथे राहत होती. ती युनिव्हर्सल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, कामण, ता. वसई येथे शिकत होती. सोमवारी दुपारी जेवताना ती मोबाइलवर बोलत होती. त्यावेळी वडिलांनी तिला आधी जेवण कर, त्यानंतर मोबाइलवर बोल, असे सांगितले. त्याचा राग येऊन भूमिकाने बेडरूममध्ये जाऊन पंख्याला गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी मुलगी बेडरूममधून बाहेर न आल्याने, दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता ती पंख्याला लटकल्याचे दिसून आले. त्यावेळी कुटुंबीयांनी तिला तत्काळ रु ग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
>पोलीस तपास सुरू
या आत्महत्येची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहेत.

Web Title: Suicide engineering student in suicide