चार चिमुरड्यांसह आत्महत्येचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST2021-08-01T04:36:36+5:302021-08-01T04:36:36+5:30

मुंब्रा : घरातून निघून गेलेली पत्नी आणि मुलगी घरी परत न आल्यास चार चिमुरड्या मुलांसह आत्महत्या करण्याचा इशारा शिळ-डायघर ...

Suicide alert with four chimpanzees | चार चिमुरड्यांसह आत्महत्येचा इशारा

चार चिमुरड्यांसह आत्महत्येचा इशारा

मुंब्रा : घरातून निघून गेलेली पत्नी आणि मुलगी घरी परत न आल्यास चार चिमुरड्या मुलांसह आत्महत्या करण्याचा इशारा शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील दहिसर गावातील विशाल कंपाऊंडमध्ये राहात असलेल्या शमशुद्दीन खान यांनी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दि. १५ जुलैला रात्री त्यांची पत्नी इमराना त्यांच्या नऊ वर्षाच्या फलक या मुलीला घेऊन घरातून निघून गेली. त्यांनी नातेवाईकांकडे तिची चौकशी केली असता, पत्नीचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे तसेच मुलांचा साभाळ करण्यासाठी अन्य व्यक्ती घरात नसल्यामुळे त्यांना कामधंदा सोडून घरी रहावे लागत आहे. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.

............

वाचली

Web Title: Suicide alert with four chimpanzees