शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस - सुधाकर देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 02:48 IST

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी शहर विकासाबाबत केलेली बातचीत.

- सदानंद नाईकउल्हासनगर शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. अस्वच्छ असलेले शहर स्वच्छ करण्याचा मानस असून आर्थिक स्थिरता शहराला लाभल्यास, शहराची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. त्यासाठी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी शहर विकासाबाबत केलेली बातचीत...उल्हासनगरासाठी व्हीजन काय आहे?शहरात असंख्य लहानमोठे उद्योग असूनही म्हणावा तसा शहराचा विकास झाला नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अर्धवट असलेली विकासकामे पूर्ण करणे, नियोजनाने शहरात विकास करण्याचा आपला मानस आहे. अर्थात, त्यासाठी सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींसह सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी मनापासून सहकार्य केल्यास, शहर उल्हसित होण्यास मदत होईल.पाणीटंंचाई दूर कशी करणार?शहराची लोकसंख्या अधिकृतपणे सहा लाख तर वाढून सांगितल्यास सात ते आठ लाख आहे. आठ लाख लोकसंख्येला १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होतो. तरीही, शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. पाण्याची गळती शून्यावर आणणे, बेकायदा नळजोडण्या खंडित करणे, जुन्या जलवाहिन्या बदलून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे.अपुऱ्या अधिकाऱ्यांबाबत काय?महापालिकेत वर्ग-१ व २ च्या अधिकाºयांची तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीच्या अधिकाºयांना शासनाने नकार दिल्याने आहे त्या अधिकाºयांकडून काम करून घ्यावे लागणार आहे.बेकायदा बांधकामांचा प्रश्न निकाली कसा काढणार?शहराला बेकायदा बांधकामांचे ग्रहण लागले असून २४ जून रोजी १५ वर्षांपूर्वीची ८५५ बांधकामांची प्रकरणे व सरकारच्या अध्यादेशानुसार काय कारवाई केली आदींचा अहवाल न्यायालयाला सादर करावा लागणार आहे. बेकायदा बांधकामांची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी २००६ च्या कायद्याप्रमाणे बेकायदा बांधकामांचा प्रश्न सरकारदरबारी लावून धरावा लागेल. तरच बेकायदा बांधकामांचा प्रश्न सुटू शकेल.महापालिकेच्या उत्पन्न व खर्चात मोठी तफावत निर्माण झाली आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागणार असून खर्चात कपात करावी लागेल. पालिकेच्या आस्थापनांवरील खर्च ६५ टक्कयांवर गेल्याने, शहर विकासासाठी ३५ टक्केच निधी शिल्लक राहतो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर