ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 22, 2024 02:31 PM2024-02-22T14:31:21+5:302024-02-22T14:31:58+5:30

महापालिका शाळांतील आठवी- नववी या इयत्तेतील २२ मुले आणि १४ मुली असे ३६ विद्यार्थी आणि आठ शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

Students of Thane Municipal Corporation's schools witnessed the missile launch | ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आठवी-नववी या इयत्तेतील ३६ विद्यार्थ्यांनी बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी इस्रोच्या केरळ येथील तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली. त्यांना तेथे आरएच-२०० या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. ठाणे महापालिका आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विज्ञानमंच या संयुक्त प्रकल्पात या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 

मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्र प्रक्षेपण, त्याची आवश्यकता, उपयोग यांची विस्तृत माहिती दिली. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिले. सर्वसाधारणपणे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी या अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होते. त्यासाठी देशभरातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक उपस्थित होते. या प्रक्षेपणानंतर विद्यार्थ्यांनी इस्रोच्या संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयात रॉकेटमध्ये इस्रोने कशी प्रगती केली, प्रथम सायकलचा नंतर बैलगाडी यांचा रॉकेट वाहतुकीसाठी कसा उपयोग केला हे विद्यार्थ्यांना पाहता आले. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा, चांद्रयान-१, मंगळयान, चांद्रयान-२ , एकाच रॉकेटद्वारे १०४ उपग्रह, चांद्रयान-३, आदित्ययान यांची मॉडेल्स दाखवून माहिती देण्यात आली. गगनयान मोहिमेचीही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रक्षेपण झाल्यावर विद्यार्थ्यांनी 'हम होंगे कामयाब' आणि 'सारे जहासे अच्छा' या समूह गीतांनी एकच जल्लोश केला. दिवसभराच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

महापालिका शाळांतील आठवी- नववी या इयत्तेतील २२ मुले आणि १४ मुली असे ३६ विद्यार्थी आणि आठ शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत. शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी हे विद्यार्थी ठाण्यात परतणार आहेत. विज्ञानमंच या उपक्रमात खगोल अभ्यासवर्ग उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. त्यातून एकूण ७७ विद्यार्थी यंदाच्या वर्षी या पाहणी दौऱ्यांसाठी निवडण्यात आले आहेत. त्यातील ४१ विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यालगत नारायणगाव येखील जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप केंद्राला भेट दिली होती. तर, उर्वरित ३६ विद्यार्थ्यांनी इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट दिली.

Web Title: Students of Thane Municipal Corporation's schools witnessed the missile launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.