शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गुंतवणुकीचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:23 PM

बँकेला दिली भेट; स्वामी विवेकानंद शाळेच्या दत्तनगर शाखेचा अनोखा उपक्रम

डोंबिवली : बँकेच्या कामकाजाची माहिती व्हावी, कामकाज प्रत्यक्ष पाहता यावे, गुंतवणुकीचे फायदे, बँकेत खाते कसे उघडावे, याचे धडे पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच गिरवले.मुले मोठी होत जातात तसतसे त्यांना व्यवहारज्ञान अवगत व्हावे आणि त्यातून योग्य प्रकारे पैसे हाताळण्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला. इयत्ता सहावी आणि सातवीच्या १०० विद्यार्थ्यांनी नांदिवली येथील एका बँकेला भेट दिली. त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना बँकेत अथवा अन्यत्र विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचे आणि निधी संकलनाचे महत्त्व समजावून सांगितले.बँकांची आवश्यकता, बँकेतील विविध खात्यांचे प्रकार, बचत, कर्ज, व्यापार, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठीचे खाते, पेन्शन खाते, व्यावसायिक खाते, भागीदारी खाते आदी विविध खात्यांची माहिती विशद करण्यात आली. बँका ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा देते, गुंतवणूकदारांना किती टक्के व्याज दिले जाते व त्याचे स्वरूप, विविध ठेवी योजना, कर्ज तसेच गृहकर्ज, शिक्षणासाठी, उच्चशिक्षणासाठी, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, सोन्यावरील कर्ज आदी प्रकारांचीही माहिती देण्यात आली.तारण म्हणजे काय, गॅरेंटर म्हणजे काय? त्याची गरज तसेच कर्जाची परतफेड म्हणून बँक आकारत असलेले व्याज, कर्जाचा एकूण कालावधी, त्याच्या अटी, नियम, ते न पाळल्यास होणारी शिक्षा, ते वसुलीच्या उपाययोजना, त्याची पद्धत काय असते, हे थोडक्यात यावेळीसांगण्यात आले.विमा योजना, एटीएमकार्ड, डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड विविध धन योजना याविषयी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक नलिनी गायकवाड, अश्विनी जोशी, योगेश बेंडाळे, अश्विनी काळे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. त्याबद्दल शाळेच्या शिक्षिका गीतांजली मुणगेकर, नयना पाटील यांनी बँक प्रशासनाचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही आगळ्यावेगळ्या माहितीतून खूप शिकायला मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.