“घर घर संविधान” उपक्रमांतर्गत घोडबंदर आणि धारावी किल्ले परिसरात विद्यार्थ्यांचा हेरिटेज वॉक
By धीरज परब | Updated: April 18, 2025 14:35 IST2025-04-18T14:34:43+5:302025-04-18T14:35:26+5:30
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त घर घर संविधान उपक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन किल्ले घोडबंदर व किल्ले धारावी येथे हेरिटेज वॉकचे आयोजन केले गेले.

“घर घर संविधान” उपक्रमांतर्गत घोडबंदर आणि धारावी किल्ले परिसरात विद्यार्थ्यांचा हेरिटेज वॉक
मीरारोड - भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त घर घर संविधान उपक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन किल्ले घोडबंदर व किल्ले धारावी येथे हेरिटेज वॉकचे आयोजन केले गेले.
घोडबंदर किल्ल्याची शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पाहणी करून किल्ल्याची माहिती व ऐतिहासिक वारसा जाणून घेतला. किल्ल्याला घोडबंदर नाव कसे पडले, त्याची रचना, बुरुज आदी बद्दल माहिती घेतल्या नंतर भारतीय संविधान व घोडबंदर किल्ला या दोन विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत व्हावी म्हणून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. आयुक्त राधाबिनोद शर्मा, प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर व नितीन मुकणे, उद्यान अधीक्षक नागेश वीरकर, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह प्रभाग समिती अधिकारी आदी उपस्थित होते.
उत्तन चौक ते चिमाजी अप्पा स्मारक परिसरात धारावी किल्ल्यावर उत्तन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने “हॅरीटेज वॉक चे आयोजन केले गेले होते. चिमाजी अप्पा स्मारक व धारावी किल्ला आदी एैतिहासिक वास्तूची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले. उपायुक्त कल्पिता पिंपळे, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिवाजी नाईक, सहायक आयुक्त लॉरेटा घाडगे, उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम, उपनिरीक्षक विजय सावंत आदी उपस्थित होते.
संविधानाविषयी व त्यातील मूल्यांविषयी शहरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “घर घर संविधान” हा उपक्रम राबविला जात आहे. संविधानाच्या मूल्यांची त्याच बरोबर वैभवशाली इतिहासाची व एैतिहासिक वास्तूंची जाणीव नव्या पिढीला करून देणे हा या मागील मुख्य हेतू असल्याचे आयुक्त डॉ. राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.