शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या तणावातून  विद्यार्थ्याची आत्महत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:14 IST

वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. तो बंगळुरू येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होता.

ठाणे : अभ्यासाच्या तणावातून राहुल समीर दळवी (१९) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर तो वास्तव्याला होता. तो बंगळुरू येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात शिकत होता. अलीकडेच १८ नोव्हेंबर रोजी तो ठाण्यात परतला होता. ठाण्यात तो आईवडील आणि आजीसह वास्तव्य करीत होता. रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरात आई आणि आजी असताना बेडरूममध्ये त्याने गळफास घेतल्याचे आढळले. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील समीर दळवी यांनी तातडीने ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात तरी अभ्यासाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे हे अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अभ्यासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे उघड झाले आहे.  

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक