डिझेलसाठी एसटीची मदार पुन्हा खासगी पंपावर; कर्मचारी संपासोबत इंधर दरवाढीचाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:25 IST2022-04-06T16:24:16+5:302022-04-06T16:25:02+5:30
कल्याण : कल्याण एसटी डेपो हा वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन असल्याने येथे प्रवासी भारमान जास्त आहे. या डेपोतून कामगारांच्या संपाच्या ...

डिझेलसाठी एसटीची मदार पुन्हा खासगी पंपावर; कर्मचारी संपासोबत इंधर दरवाढीचाही फटका
कल्याण : कल्याण एसटी डेपो हा वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन असल्याने येथे प्रवासी भारमान जास्त आहे. या डेपोतून कामगारांच्या संपाच्या आधी ६० बस धावत होत्या. कोरोनाकाळात ही अत्यावश्यक सेवेसाठी ६० बसकरिता दिवसाला चार हजार लिटर डिझेल लागत होते. संपामुळे कर्मचारी हजर झालेले नाहीत.
संप अद्याप सुरूच असल्यानेे त्याचा फटका डेपोला बसला आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्या जोरावर डेपोतून सध्या २५ बस चालविल्या जात आहेत. त्यापैकी काही बस या भिवंडी मार्गावर चालविल्या जात असून त्यांचे डिझेल हे भिवंडी डेपोतून भरले जाते. मात्र, ९ बसचे डिझेल हे कल्याणमधील खासगी पंपावरून भरले जात असून याकरिता दिवसाला दीड हजार लिटर डिझेल लागत आहे. खासगी पंपाशी करार करून ते भरले जाते. गेल्या पंधरा दिवसात डिझेलची किंमत १२ वेळा वाढली आहे. याआधी डिझेल ९७ रुपये होते. त्यात वाढ होऊन ते आजमितीस १०३ रुपयांवर पोहचले आहे. कोरोनाकाळात डेपोला आर्थिक फटका बसला. कोरोनाकाळातून डेपो सावरत नाही. तोच संपाचा फटका डेपोच्या अर्थकारणास बसला आहे. त्यात डिझेलमध्ये सातत्याने होणारी वाढ ही डेपोला अधिकच आर्थिक अडचणीच्या गर्तेत लोटत असल्याचे दिसून येत आहे.
महामंडळाच्या पंपापेक्षा बाहेर महाग
बस डेपोत पंप होता. तो सध्या बंद आहे. महामंडळाच्या पंपावर जो दर आहे. त्याच दराने भरले जात होते डिझेल. खासगी पंपापेक्षा जास्त दर लावला असल्याने ते महागात पडते.
या पंपाशी झाला करार
कल्याण टाटा पॉवर येथील समर्थ पेट्रोल या खासगी पंपावर बस डेपोतील बमध्ये डिझेल भरले जाते. त्यांच्याशी करार झालेला आहे.
सध्या खासगी पंपावर ९ बसमध्ये डिझेल भरले जाते. त्या पंपावर आमचा एक माणूस असतो. त्या सगळ्य़ा नोंदी करतो.
-विजय गायकवाड,व्यवस्थापक, कल्याण बस डेपो.
सध्या सुरू असलेल्या बस-२५
एसटीला इंधन पुरविणारे पंप-०१
दिवसाला किती लागते डिझेल-१५०० लिटर