स्कायवॉकवर राहणार कडक पहारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:28 PM2020-02-23T23:28:58+5:302020-02-23T23:29:04+5:30

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला लागणार लगाम; पथकांना प्रत्येकी आठ तासांची ड्युटी

Strict watch on Skywalk! | स्कायवॉकवर राहणार कडक पहारा!

स्कायवॉकवर राहणार कडक पहारा!

Next

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी दोन प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे केल्याने फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथके धास्तावली आहेत. सकाळी आठ ते रात्री ११ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये फे रीवाला मनाई क्षेत्रात कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून सकाळच्या सत्रातील कर्मचाऱ्यांनी दुपारच्या सत्रातील कर्मचारी कामावर हजर झाल्याशिवाय तेथून निघायचे नाही, अशीही तंबी देण्यात आली आहे.

आयुक्त सूर्यवंशी यांनी बुधवारी केलेल्या दौºयात रेल्वे स्थानकालगतच्या महापालिकेच्या कल्याण-डोंबिवलीतील दोन्ही स्कायवॉकवर फेरीवाले बसलेले दिसले. यानंतर आयुक्तांनी ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांना निलंबित केले आहे. तर ‘फ’ प्रभागातील फेरीवाला पथकातील कर्मचारी गणेश माने याच्यावरही कारवाई केली आहे.

फेरीवाला मनाई क्षेत्रात यापुढे एकही फेरीवाला बसणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाºयांना दिली आहे. आयुक्तांच्या दणक्यानंतर प्रभाग अधिकाºयांसह पथकातील कर्मचारी चांगलेच कामाला लागले आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी तीन ते रात्री ११ अशी दोन शिफ्टमध्ये ड्युटी पथकातील कर्मचाºयांना लागली आहे. त्यांच्याबरोबर बंदोबस्तावरील पोलिसांनाही ड्युटी लागली आहे.

सहायक आयुक्तच हवेत, मात्र नियम बसवला जातोय धाब्यावर
प्रभाग अधिकारी हा सहायक आयुक्तच असावा असा नियम आहे. हा नियमच धाब्यावर बसवला जात आहे. त्यामुळे फेरीवाला असो अथवा बेकायदा बांधकामावरील कारवाई प्रभावीपणे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. निलंबन कारवाईनंतर ‘क’ आणि ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारीपद अद्याप रिक्त आहे. सहायक आयुक्तपदावर असलेल्या अधिकाºयाला प्रभाग अधिकारी म्हणून नेमतात का? याकडेही लक्ष लागले आहे. तसेच, मनुष्यबळाअभावी पथकांची दमछाक होत आहे. क आणि फ प्रभागात कर्मचाºयांची कमतरता आहे. पथकामध्ये १५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच सहा वर्षांपासून कर्मचाºयांच्या बदल्याही झालेल्या नसल्याने अडचणी येत आहेत.

Web Title: Strict watch on Skywalk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.