शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी; मेहनत करून पोट भरणा-यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:12 IST

महापौर, आयुक्त आणि अन्य पक्षांच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवू नये, असा निर्णय झाला असताना अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवला म्हणून १० जुलैला रात्री मीरा-भार्इंदरमध्येही १८ जुलैपर्यंत लॉकडाऊ न वाढवला.

- धीरज परबमीरा रोड : मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्याने मीरा-भार्इंदरमधून नागरिक कामासाठी रोज जात असताना शहरात लॉकडाऊन वाढवला आहे. याबाबत दुकानदार, उद्योजकांसह रोजंदारीवर पोट असणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनपेक्षा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या काही निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करायला लावा, असे या सर्वांचे म्हणणे आहे. महापालिकेने आधी १ ते १० जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. महापौर, आयुक्त आणि अन्य पक्षांच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवू नये, असा निर्णय झाला असताना अन्य महापालिकांनी लॉक डाऊन वाढवला म्हणून १० जुलैला रात्री मीरा-भार्इंदरमध्येही १८ जुलैपर्यंत लॉकडाऊ न वाढवला.यादरम्यान कोरोना चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाणही वाढल्याचे आकडे समोर आले. यामुळे लॉकडाऊ न करूनही रुग्ण वाढत असतील तर उपयोग काय ? असा प्रश्न केला जात आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर उपजीविका चालवणाऱ्यांसह दुकानदार व उद्योजकही आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये स्टील उद्योग तसेच लहानसहान कारखाने मोठ्या संख्येने आहेत.लॉकडाऊनमुळे कारखाने तीन महिने बंद असल्याने आता कुठे कारखाने हळूहळू सुरू होत असताना पुन्हा लॉकडाऊन वाढवल्याने उद्योग-व्यवसाय व त्यातून मिळणारा रोजगार मोडीत निघेल, असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे दीपक शाह म्हणाले. लॉकडाऊनमध्ये खुलेआम भाज्या आदी विक्री तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा नागरिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करायला लावा, असे दुकानदार अनुप सातोस्कर म्हणाले. जर नियमांचे पालन केले तर अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले.मेहनत करून पोट भरणा-यांचे काय?लॉकडाऊ नचा राजकारणी, अधिकारी, बिल्डर, मोठे व्यापारी आदींना फरक पडत नाही. पण, रोज मेहनत करून पोट भरणाºया आणि लहानसहान नोकरी-व्यवसाय करणाºया सर्वसामान्यांवर मात्र उपाशी मरायची वेळ आली आहे, असा संताप गटईकाम करणाºया अमृत डोंगरे यांनी बोलून दाखवला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर