शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी विरोध केल्यास कठोर कारवाई होणार

By जितेंद्र कालेकर | Updated: April 29, 2020 01:32 IST

पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये नागरिकांचा विरोध होत आहे. असा विरोध किंवा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला इशारापोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर तुम्ही पोलिसांसाठी घरीच रहा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अत्यावश्यक सेवेतील अथवा वैद्यकीय सेवेतील कर्मचाºयांना कोणीही विरोध किंवा हल्ला केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या महिनाभरातील काळात ठाणेकरांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त फणसळकर यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात ठाणेकर जनतेने पोलीस आणि प्रशासनाला अभूतपूर्व सहकार्य केले आहे. अतिशय धैर्य दाखवून काळजी घेत बहुतांश नागरिक हे घरातच थांबले आहेत. परंतू, त्यातही काहीजण अनावश्यकपणे घराबाहेर पडतांना निदर्शनास येते. काहीजण नाहक गर्दीही करतात. त्यामुळे अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई करावी लागली. त्यांची वाहनेही मोठया प्रमाणात जप्त केली आहेत. अजूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलेली किंवा स्थिरावलेली नाही. विशेषत: ठाणे शहर, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी शासनाचे विभाग कठोर परिश्रम घेत आहेत. पोलीसही रात्रंदिवस तैनात आहेत. अशा देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी अशा अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये मात्र नागरिकांचा विरोध होत आहे. शिवाय, एका डॉक्टरला मारहाणीचा प्रकारही भार्इंदर पाडा येथे दोन दिवसांपूर्वी घडला. मुळात, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते काम करीत आहेत. त्यांना विरोध करणे हे अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीर आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फणसळकर यांनी दिला आहे. सध्या रमजानच्या काळात मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. सर्वांनी संघटीतपणे कोरोनावर मात करु असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पोलीस तुमच्यासाठी रस्त्यावर आहेत. तुम्ही पोलिसांसाठी घरीच रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस