भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; ३०० रुपये घेऊन अवजड वाहनांना देतात प्रवेश

By नितीन पंडित | Updated: September 22, 2025 16:18 IST2025-09-22T16:18:06+5:302025-09-22T16:18:06+5:30

या व्हिडीओची यंत्रणेने दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल

strange behavior of traffic police in bhiwandi they allow entry to heavy vehicles by charging rs 300 | भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; ३०० रुपये घेऊन अवजड वाहनांना देतात प्रवेश

भिवंडीत वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; ३०० रुपये घेऊन अवजड वाहनांना देतात प्रवेश

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी असतांनाही गोदामांमध्ये जाणाऱ्या अवजड वाहनांकडून ३०० रुपये हफ्ता घेऊन अवजड वाहनांना रस्त्यावर प्रवेश दिला जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.वाहतूक कोंडीत अडकलेल्या ऍड.भारद्वाज चौधरी यांनी हा व्हिडीओ केला असेल फेसबुक लाईव्हमध्ये अवजड वाहनांकडून वाहतूक पोलिसांनी ३०० रुपये घेतले असल्याची माहिती खुद्द ट्रक चालकाने दिली आहे.त्यामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांची हाफ्तेखोर कशी जबाबदार आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आले आहे.

भिवंडीत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून शहरालगतच्या ग्रामीण पट्ट्यात असलेल्या गोदामांमध्ये अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असल्याने भिवंडीतील अंजुर फाटा काल्हेर कशेळी ते ठाणे मार्ग त्याचबरोबर अंजुर फाटा वळगाव दापोडे मानकोली तसेच मुंबई नाशिक महामार्गावर पिंपळास ते खारेगाव ब्रिज पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी वाहतूक विभागाने भिवंडीत अवजड वाहनांना बंदी केली आहे. या संदर्भातील वेळापत्रक देखील वाहतूक विभागाने प्रसिद्ध केले आहे. मात्र असे असताना भिवंडीत अवजड वाहन चालकांकडून ३०० रुपये वसूल करून अवजड वाहनांना थेट रस्त्यावर प्रवेश दिला जात आहे.याबाबत भिवंडीतील वकील भारद्वाज चौधरी यांनी वाहतूक पोलिसांच्या हप्ते वसुलीचा सोशल मीडियाद्वारे लाईव्ह भांडाफोड केला आहे. सध्या ही व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांना वेठीस धरून वाहतूक पोलीस कशा पद्धतीने हप्ते वसुली करत आहेत याचे थेट प्रक्षेपण एड. चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केले आहे. ही व्हिडिओ भिवंडीत प्रचंड व्हायरल झाली असून या व्हिडिओच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांचा अनागोंदी व हप्ते खोरीचा काळाबाजार समोर आला आहे.

मागील महिन्यात मानकोली नाक्यावर वाहतूक पोलीसांच्या हफ्तेखोरीचा भांडाफोड सोशल मीडियावर केला होता,तेव्हा काही काळ वाहतूक कोंडी कमी झाली होती मात्र आता पुन्हा वाहतूक पोलिसांची हाफ्तेखोर समोर आली असून येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस उपायुक्त सपशेल अपयशी ठरले असून शासनाने भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा,संस्था अथवा अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे अशी प्रतिक्रिया ऍड.भारद्वाज चौधरी यांनी दिली आहे.  या व्हिडीओची यंत्रणेने दखल घेतली असून यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.

Web Title: strange behavior of traffic police in bhiwandi they allow entry to heavy vehicles by charging rs 300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.