आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण...
By प्रशांत माने | Updated: March 12, 2025 22:48 IST2025-03-12T22:45:57+5:302025-03-12T22:48:36+5:30
RSS च्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना आज निलंबित करण्यात आले आहे.

आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण...
-प्रशांत माने, डोंबिवली
डोंबिवली: ठाकुर्ली परिसरातील कचोरे परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना आज निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रविवारी शाखेवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. दगडफेक प्रकरणात पाच आरोपींना टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत.
दरम्यान, या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तपासात गांभीर्य न दाखवता आरोपींना न्यायालयात हजर केले नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
डोंबिवलीत आर एस एस च्या कार्यकर्त्यांनी दगडफेकी प्रकरणाचा निषेध नोंदवला संध्याकाळी पूर्व आणि पश्चिमेला छेडण्यात आलेल्या आंदोलनात मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.