वज्रेश्वरीच्या दत्त मंदिरात चोरी

By Admin | Updated: January 14, 2017 06:01 IST2017-01-14T06:01:09+5:302017-01-14T06:01:09+5:30

वज्रेश्वरीदेवीच्या प्रांगणात असलेल्या दत्त मंदिरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन तरु णांनी दानपेटी पळवून नेली. मंदिर बंद

Stolen in Vajreshwari's Datta temple | वज्रेश्वरीच्या दत्त मंदिरात चोरी

वज्रेश्वरीच्या दत्त मंदिरात चोरी

वज्रेश्वरी : वज्रेश्वरीदेवीच्या प्रांगणात असलेल्या दत्त मंदिरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन तरु णांनी दानपेटी पळवून नेली.
मंदिर बंद करण्याच्या सुमारास दोन सुरक्षारक्षक मुख्य मंदिर आणि इतर मंदिरे बंद करीत असल्याचा फायदा घेत दत्त मंदिराजवळ कुणी नसल्याचे पाहून दोन तरु णांनी मंदिरात शिरून त्यांनी दानपेटी दत्त मंदिरावर नेली. तिथे ती फोडून त्यातील रक्कम घेऊन पसार झाले. त्यानंतर, सुरक्षारक्षक तिथे आले असता त्यांना दानपेटी नसल्याचे लक्षात येताच गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार केली.
पोलिसांना गस्त घालत असताना दोन तरु ण दुचाकीवर दिसले. त्यांना हटकले असता प्रफुल्ल पाटील, वैभव जाधव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीच्या या प्रकारामुळे गावातील गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Stolen in Vajreshwari's Datta temple