चोरट्याकडून हँडबॅगा चोरीला

By Admin | Updated: April 14, 2016 01:26 IST2016-04-14T01:26:21+5:302016-04-14T01:26:21+5:30

मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी वेगवेगळ्या दोन हँडबॅगा खेचून पलायन केले. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे. पाचपाखाडी येथील फिर्यादी मित्रासमवेत मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या

Stolen handbags from thieves | चोरट्याकडून हँडबॅगा चोरीला

चोरट्याकडून हँडबॅगा चोरीला

ठाणे : मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी वेगवेगळ्या दोन हँडबॅगा खेचून पलायन केले. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे. पाचपाखाडी येथील फिर्यादी मित्रासमवेत मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास माजिवड्याहून रिक्षाने निघाले होते. त्यांची रिक्षा कॅडबरी सिग्नलकडे जात असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने रिक्षातील बॅग खेचून पलायन केले. याचदरम्यान, कॅडबरी सिग्नलजवळ पोहोचल्यावर चोरट्यांनी बॅगेतील २०० रु पये काढले. याचदरम्यान, चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. त्या वेळी झालेल्या झटापटीत चोरटे मोटारसायकलवरून खाली पडल्यानंतर मोटारसायकल सोडून ते पळून गेले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या घटनेत, रूणवालनगर येथील ३५ वर्षीय महिला त्यांच्या मैत्रिणीसोबत दत्त मंदिर येथे बोलत उभ्या असताना दुचाकीच्या सीटवर ठेवलेली पर्स मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी उचलून पोबारा केला. यामध्ये दोन मोबाइल, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि रोख ५० हजार असा ८३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Stolen handbags from thieves