शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ठाण्यातील कोरोना सेंटरमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच रेमडेसीवीरचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:19 IST

खाजगी रुग्णालयात पुरवठा अद्यापही उपलब्ध नाही. मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यातही रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे. ठाणे महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये केवळ ८०० च्या आसपास रेमडेसिवचा साठा उपलब्ध असून तो केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिवरचा पुरवठाच होऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची हे इंजेक्शन मिळावे, यासाठी धावपळ आजही सुरुच असल्याचे दिसत आहे. 

            मागील काही दिवसापासून ठाण्यासह राज्याच्या विविध भागात रेमडेसिवरच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे दिसत आहे. परंतु या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी आता शासनाकडून मेडीकलमधील रेमडेसिवर विकले जाणार नसल्याचे सांगण्यात होते. परंतु त्यालाही चार ते पाच दिवस उलटून गेले तरी देखील खाजगी कोवीड रुग्णालयात देखील रेमडेसिवरचा साठा उपलब्ध होऊ शकला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज चार दिवस उलटूनही खाजगी रुग्णालयाकडून रेमडेसिवरचे इंजेक्शन मिळावे यासाठी खाजगी रुग्णालयांनी महापालिकेकडे पत्रव्यहार केला आहे. एकीकडे खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत असतांना आता रेमडेसिवरचा देखील साठा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर उपचार कसे करावेत असा पेच डॉक्टरांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी रुग्णांची धावपळ सुरु आहे. सोशल मिडियावर हे इंजेक्शन मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. परंतु अद्यापही हा साठा उपलब्ध झालेला नाही.

दुसरीकडे ठाणो महापालिकेकडे आजच्या घडीला ८०० च्या आसपास रेमडेसिवरचा साठा असून तो पुढील एक ते दोन दिवस पुरेल एवढाच आहे. १८ एप्रिल र्पयत साठा मिळेल अशी आशा पालिकेला आहे. परंतु तो मिळाला नाही तर कठीण होऊन बसेल अशी भितीही पालिकेला वाटत आहे. त्यामुळेच खाजगी रुग्णालयांकडून मागणी होऊनही पालिका त्यांना रेमडेसिवरच पुरवू शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस