उल्हासनगर महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा बैठक
By सदानंद नाईक | Updated: September 3, 2025 18:34 IST2025-09-03T18:34:04+5:302025-09-03T18:34:32+5:30
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

उल्हासनगर महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा बैठक
उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाकार्यालयात मंगळवारी रात्री पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, रवि जेसवानी, जीतू जेसवानी, महादेव बगादे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहर पक्ष पदाधिकाऱ्या सोबत बैठक घेतली. तसेच सर्वांचे मते जाणून घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आमदार कुमार आयलानी, जिलाध्यक्ष राजेश वधारिया, महेश सुखरमानी, लाल पंजाबी, अजीतसिंग लबाना, प्रकाश माखीजा, अमर लुंड, प्रदीप रामचंदानी, शेरी लुंड, संजय सिंह, प्रशांत पाटिल, किशोर बनवारी, कपिल अडसुळ, मनीष हिंगोरानी, मनोज साधनानी आदिजण उपस्थितीत होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सतरामदास जेसवानी, महादेव बगाडे यांनी भाजपात प्रवेश केला. जेसवानी व बगाडे यांच्या प्रवेशाने शहर पूर्वेत भाजपाची ताकद वाढल्याची प्रतिक्रिया आमदार आयलानी यांनी दिली.
महापालिकेच्या सर्वात्रिक निवडणुकीत प्रभाग क्रं-१७ मधून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर भारत गंगोत्री, सुमन सचदेव, सुनीता बगाडे व सतरामदास जेसवानी असे चौघेजण निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुमन सचदेव व सतरामदास जेसवानी यांनी पप्पू कलानी यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटा सोबत राहणे पसंत केले. सतरामदास जेसवानी यांनी दोन्ही मुलासह भाजपात प्रवेश केला. तर सुनीता बगाडे ह्या गंगोत्री यांच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटात राहिल्या आहेत. मात्र त्यांचे नातेवाईक महादेव बगाडे यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने गंगोत्री यांना राजकीय धक्का बसला असून प्रभाग क्रं-१७ हा गंगोत्री त्यांचा गड मानला जात आहे.