महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन

By नितीन पंडित | Updated: February 8, 2024 17:13 IST2024-02-08T17:12:39+5:302024-02-08T17:13:00+5:30

या अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.

State Level Convention of Maharashtra State Talathi Sangh at Chhatrapati Sambhajinagar | महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अधिवेशन

भिवंडी: महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे रविवार ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होत असल्याची माहिती राज्याचे सरचिटणीस राज्य सरचिटणीस संतोष आगीवले यांनी गुरुवारी भिवंडीत दिली आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणाऱ्या या अधिवेशनात छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे,राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.राज्यभरातील तलाठी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या एक दिवसीय अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात "आनंदाचे शोधावे घर, दुःखाच्या ही छाताडावर "या विषयावर सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे व्याख्यान होणार असून दुपारच्या सत्रात मान्यवरांचे मार्गदर्शन,स्मरणिका प्रकाशन व मागण्यांचे वाचन केले जाणार आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस व पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिली आहे.

Web Title: State Level Convention of Maharashtra State Talathi Sangh at Chhatrapati Sambhajinagar