शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची रॅपिड टेस्ट सुरू करा, केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 01:14 IST

सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील.

कल्याण - कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.महापालिका हद्दीत कोरोनाची टेस्ट घेतली जात आहे; मात्र त्याचे रिपोर्ट येण्यास बराच उशीर लागतो. कल्याण-डोंबिवली हद्दीत या आठवड्यात एका रुग्णाची मंगळवारी कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय धास्तावलेले आहे. रिपोर्ट आलेला नसल्यामुळे त्याच्यावर कोरोनाचा उपचारही सुरू करता येत नाही.रिपोर्ट नसल्याने कोरोनासाठी सध्या दिले जात असलेले इंजेक्शनही मेडिकलमधून दिले जात नाही. त्याचा मनस्ताप रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना सोसावा लागतो. एखादा रुग्ण आयसीयूमध्ये असल्यास त्याच्याकडे मोबाइल दिला जात नाही. त्याच्या कुटुंबीयांना आत सोडले जात नाही. त्यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क राहत नाही. या सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील. रुग्णाचा रिपोर्ट मिळताच रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याचा अन्य लोकांशी संपर्क येणार नाही, असे धात्रक म्हणाले.मागील काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. काहीवेळा उच्चांकही गाठला आहे. यावर आळा घालण्यासाठी पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.खर्च पालिकेने उचलावा!रॅपिड टेस्टसाठी केवळ ४०० रुपये खर्च येतो. सध्या २२०० रुपयांपेक्षा हा ४०० रुपये खर्च रुग्णांच्या खिशाला परवडणारा आहे. खर्च कमी असल्याने हा खर्च महापालिकेने उचलावा. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या १७ कोटी रुपये निधीपैकी काही निधी हा टेस्टवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी धात्रक यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका