शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवी परिसरातील तीनही वाहनतळ सुरू करा, काँग्रेसचे महापालिकेला साकडे

By सुरेश लोखंडे | Updated: February 26, 2023 14:01 IST

ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करतात पण स्टेशन परिसरात पुरेशी जागा नाही.

सुरेश लोखंडे/ठाणे

ठाणे : येथील रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही.रेल्वे प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने त्यांचे गावदेवी परिसरातील तीन वाहनतळ ठाणेकर वाहनचालकांना तातडीने उपलब्ध करुन देत  वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या दूर करावी,अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे केली, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.           ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीचा वापर करतात पण स्टेशन परिसरात पुरेशी जागा नाही. तसेच स्टेशन जवळील मुख्य बाजारपेठेत चार चाकी वाहन घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या वाहनांना पार्किंगसाठी कुठेही जागा नाही.पार्किंग अभावी नागरिकांना टोविंग व्हॅन,नो पार्किंगच्या दंडाचा  भुर्दंड पडत आहे. याकडे लक्ष केंद्रीत करुन काँग्रेसने या ठाणेकरांच्या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधले. ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यात गावदेवी परिसरात एकूण तीन वाहनतळ आहे. त्यामुळे गावदेवी मार्केट, गावदेवी मैदान,कुस्तीगीर भवन इमारतीच्या बाजूला असलेला वाहनतळ आदी तीन्ह वाहनतळे बंद न ठेवता ती तातडीने सुरू करुन पार्किंग समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसने महापालिकेला धारेवर धरले आहे. वाहन तळ बंद ठेवणे हे महानगरपालिकेचे पार्किंग धोरण आहे का.? असा सवालही शेवाळे यांनी विचारला आहे.         स्टेशन परिसरातील ठाणेकरांची पार्किंगची होणारी गैरसोय तातडीने दूर करा. येथील तीन्ह वाहनतळ खुले करण्याचा निर्णय तातडीने दहा दिवसात घेण्यात यावा, अशी मागणी राहुल पिंगळे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कडे केली आहे. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcongressकाँग्रेसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका