चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 22:16 IST2017-09-07T22:16:49+5:302017-09-07T22:16:59+5:30
चाकूच्या धाकावर एका सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अश्विन टर्पे (२३, रा. टर्पेपाडा, ब्रह्मांड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक
ठाणे, दि. 7 - चाकूच्या धाकावर एका सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अश्विन टर्पे (२३, रा. टर्पेपाडा, ब्रह्मांड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित मुलगी ही घोडबंदर रोडवरील बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करते. अश्विन हाही त्याच परिसरात मजुरीचेच काम करतो. ती घोडबंदर रोडवरील तिच्या घरी एकटीच असताना त्याने चाकूच्या धाकावर तिच्यावर २०१३ मध्ये लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केलीस तर जीव घेईल. तसेच आईवडिलांसह संपूर्ण समाजामध्ये तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन २०१३ ते जानेवारी २०१७ पर्यंत या चार वर्षांमध्ये तिच्यावर त्याने अनेकदा टर्पेपाडा आणि ब्रह्मांड येथील शिवनेरी टॉवरसमोरील एका पत्र्याच्या शेडमधील एका खोलीत बलात्कार केला.
त्याच्याकडून होणाºया वाढत्या अत्याचाराला कंटाळून तिने अखेर ६ सप्टेंबर रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पोलिसांनी अश्विन याला अटक केली.