एसटीचालकाला बेदम मारहाण, तरुणाला जोगेश्वरीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:19 IST2018-10-03T05:19:28+5:302018-10-03T05:19:33+5:30

विलेपार्लेतील प्रकार : तरुणाला जोगेश्वरीतून अटक

The stalker was stunned, the youth arrested from Jogeshwar | एसटीचालकाला बेदम मारहाण, तरुणाला जोगेश्वरीतून अटक

एसटीचालकाला बेदम मारहाण, तरुणाला जोगेश्वरीतून अटक

मुंबई : मित्राच्या मोटारसायकलला ठोकरल्याच्या कारणावरून एका तरुणाने राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.) चालकाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार रविवारी रात्री विलेपार्ले येथे घडला. या प्रकरणी यश राठोड (२०) याला पोलिसांनी अटक केली. त्याने बोरीवली-चिपळूण बसचे चालक लक्ष्मण कांबळे (३५) यांना मारहाण केली. अपघातात जखमी झालेला मित्र एस. राठोड याला परिसरातील रुग्णालयात नेले असल्याच्या अंदाजावरून पोलिसांनी यश राठोडचा शोध घेतला.

रविवारी रात्री १०.३०च्या सुमारास अंधेरी उड्डाणपुलावर काही तरुण भरधाव वेगाने मोटारसायकलवरून फिरत होते. त्यामध्ये एस. राठोड (२१) हा तरुण मोटारसायकलसह रस्त्यावर घसरून खाली पडला. मागून येणाऱ्या यश राठोडने जखमी मित्राला पाहिले तेव्हा त्याच्या मागे ‘चिपळूण-बोरीवली’ ही एसटी बस उभी होती. बसने ठोकरले असल्याच्या संशयाने त्याने बसचालकाला मारहाण केली. त्यानंतर मित्राला घेऊन निघून गेला.
या परिसरात विलेपार्ले पोलीस ठाण्यातील निरीक्षक राजेंद्र काणे व स. नि. शीव भोसले गस्त घालत होते. त्यांना कांबळे यांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर यशचा शोध सुरू केला. जोगेश्वरीतील ट्रामा केअर रुग्णालयात तो मित्रासमवेत होता. यश हा अंधेरी-मोगरापाडा येथील रहिवासी असून, तो बारावी इयत्तेत शिकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The stalker was stunned, the youth arrested from Jogeshwar