- धीरज परबमीरा रोड - आपल्या प्रभागातील मतदारांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी एसटी बस सोडल्या जातात. सालाबादप्रमाणे यंदाही दहिसरपासून जोगेश्वरीपर्यंतच्या काही भाजप, शिंदेसेनेच्या नेतेमंडळींनी मोठ्या संख्येने कोकणातून एसटी बस मागवल्या, मात्र त्या उभ्या करायला आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी स्वत:च्या मतदारसंघात जागा न करता मीरा-भाईंदर पालिकेकडे जागेची मागणी केली. पालिकेने जागा दिलीही. मात्र, एसटीच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी न केल्याने स्वच्छतागृह, आरामाची व्यवस्थेअभावी अनेक चालक, वाहकांचे परिवहनमंत्र्यांच्या मतदारसंघातच हाल झालेले दिसले.
समन्वयाचा अभाव नडला : मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर, जोगेश्वरी भागातील नेत्यांनी एसटी बस बुक केल्या. अशा बसची एकूण संख्या पहिल्या टप्प्यातील ११० इतकी झाली. या बस उभ्या करण्यास आणि चालक - वाहकांच्या सुविधेसाठी मीरा रोडच्या जेपी संकुल जवळ आणि पालिका बस डेपोच्या पहिल्या मजल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना २३ ते २५ ऑगस्ट सुविधा केली आहे. परंतु एसटी अधिकारी यांनी डेपोतील संबंधित यांच्याशी समन्वय साधून जागेची आधीच येऊन पाहणी, व्यवस्था तपासली नसल्याने वाहक, चालकांची गैरसोय होत आहे.
घडल्या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. असला प्रकार खपवून घेणार नाही. एसटी बस ज्या भागातील भाविकांसाठी बुक केल्या होत्या त्याच भागात कर्मचारी व बस पार्किंग यांची सोय केली पाहिजे होती. कर्मचाऱ्यांची राहायची, जेवणाची सोय सुविधा बघितलीच पाहिजे.- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
अनेक कर्मचाऱ्यांनी एसटीतच काढली रात्रडेपोतील व्यवस्था तुटपुंजी असल्याने व बस उभ्या केल्याचे ठिकाण डेपोपासून लांब असल्याने बहुतांश कर्मचारी शुक्रवारी रात्री बसमध्येच किंवा परिसरात मिळेल तिथे झोपले. हे माहीत पडताच मनसेच्यावतीने कर्मचाऱ्यांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
प्रातःविधीसाठी अनेकांची कुचंबनासिंधुदुर्गातील विविध डेपोतून आलेल्या एसटी पहाटे मीरा रोड येथे आल्या. डेपोत पहाटे कर्मचारी गेले असता त्यांना काहीच कल्पना नसल्याने ६ च्या नंतर येण्यास सांगितले. प्रातःविधीसाठी अनेकांची कुचंबणा झाली.
ढिसाळ नियोजनावर संताप ढिसाळ नियोजनावर मनसे, काँग्रेस आदींनी टीका केली. ठाण्याच्या खोपट येथे बसमध्ये डिझेलची व्यवस्था केली असून, मीरा रोड येथे जाण्यास सुमारे ८ ते ९ तास वाया गेल्याने कमर्चाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.