ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, २८ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:41 IST2018-06-21T14:28:48+5:302018-06-21T15:41:57+5:30
जखमींना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

ठाण्यातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची टक्कर, २८ जण जखमी
ठाणेः ठाणे रेल्वे स्टेशनला लागूनच असलेल्या सॅटिस पुलावर ठाणे-भिवंडी आणि ठाणे-शहापूर या दोन बसची धडक होऊन झालेल्या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या बसचा गिअर बॉक्स जॅम झाला होता. त्यामुळे ब्रेक लागत नसल्याने ही बस थेट सॅटीस पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. त्याच वेळी पाठिमागून आलेल्या ठाणे-शहापूर एसटीने या एसटीला जोरदार धडक दिल्याने एसटीचा चक्काचूर झाला. या विचित्र अपघातात एसटीतील २५ ते ३० जण जखमी झाले. या सर्वांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी रुग्णांना एसटी प्रशासनाकडून 500 रूपये उपचार खर्चासह पी फॉर्म देण्यात आला आहे.